पगार बीलासंबधी मार्गदर्शक सुचना

पगार बील शालार्थनुसार तयार करण्यासंबंधी मार्गदर्शक सुचना

*    सर्व माहिती भरलेली असेल तर आपणास काही महत्वाच्या स्टेपमध्ये बदल करावा लागेल.

*    Worklit > payroll > Employee Information या स्टेपचा वापर आपणास बील तयार करण्यासाठी महत्वाचा आहे यातिल आपण प्रत्येक पायरी समजून घेवू.

*    Worklit > payroll > Employee Information > Non computional dues and Diduction या पायरीचा उपयोग आपणास मिळणारे Allowances आणि Government Diduction यासाठी आहे. उदा. Add.HRA, Naxal Allowance, Permanent Travling Allowance या रकमा यामध्ये टाकाव्यात तसेच पुढिल महिन्यामध्ये काही बदल असल्यास या पायरीला उघडून तो बदल करून save करावे.

*    आणि Government Diduction मध्ये बदल करावयाचे असतिल उदा Gpf, GIS या पायरीचा उपयोग करून बदल करावा.

*    शासकिय कर्ज असल्यास त्याची मासीक परतफेड व्याजासह करण्यासाठी Worklit > payroll > Employee Information > Non computional > Employee loan Details या पायरीचा उपयोग करावा.

*    एखादा कर्मचारी महिन्यातील काही दिवस उपस्थित असेल त्याचा तेवढया दिवसाचा पगार काढण्यासाठी Broken Period या पायरीचा उपयोग करावा. यामध्ये अगोदर त्याचा एका दिवसाचा भत्यानूसार पगार काढून  जेवढे दिवस उपस्थित आहे तेवढया दिवसाचा पगार भरावा तसेच कपाती या पूर्ण महिन्याच्या यामध्ये भराव्यात.

*    नविन Increment लावण्यासाठी Release Annual Increment या पायरीचा उपयोग करावा. यामध्ये आदेश क्रमांक दिनांक टाकून Go वर क्लिक करावे. ज्यांना Increment लावायचे असतील अशा नावासमोर चौकटीमध्ये टिक करून Add करून घ्यावेत. ही माहिती लगेच गटशिक्षणाधिकारी यांच्या Login वर दिसेल त्यांना मान्य असल्यास ते Approve करतील. मग Incremet लागेल.

*    Non Government Diduction असल्यास Non Government या पायरीचा उपयोग करावा यामध्ये बदल असल्यास ही पायरी पुन्हा वापरून आवश्यक तो बदल करून घ्यावा. उदा.Socity, Bankloan, Lic, RD, etc.

*    एखाद्या व्यक्तीची सेवा समाप्त्‍ झाली असल्यास शालार्थमधून ती समाप्त्‍ करण्यासाठी Service End Date या पायरीचा उपयो करावा. यामध्ये सेवा सामप्त झालेला आदेश क्रमांक दिनांक तसेच कारण नमुद करावे.

*    पगाराचा Data पूर्ण भरूण झाल्यानंतर Pay Bill generate करावे.
यासाठी worklist > Payroll > Payroll Generation/view > Generate/regenerate paybill.

*    बील तयार झालेला असेल आणि तो बरोबर असेल तर Forword करणे

*    बीलाच्या पूर्ण कॉपी प्रिंट काढण्यासाठी Report मध्ये जावून All report वर clik करणे. त्यामध्ये महिना Bill Id Select करून show report वर clik करणे. नंतर सर्व पानांच्या print काढणे.


अशा रितीने आपला शालार्थप्रणालीनुसार पगारबील तयार होईल.

No comments:

Post a Comment